Indian Premier League : IPL क्रिकेट विश्वातील एक रोमांचक व जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. यात अनेक देशाचे दिग्गज तसेच नवखे प्रतिभावान क्रिकेट खेळाडू नशीब अजमावत असतात.
Indian Premier League
इंडियन प्रीमिअर लीग 2008 पासून दर वर्षी आयोजित केली जाते. 'Indian Premier League' भारत, दक्षिण आफ्रिका व संयुक्त अरब अमिरात मध्ये आयोजित करण्यात आली आहे. भारतात नैसर्गिक आपत्ती, राजनीतिक, अंतर्गत कलह, असल्यास भारताबाहेर आयोजित करण्यात येते. IPL (Indian Premier League) ने भारत सरकार, BCCI च्या महसूलात वाढ केली आहे. तसेच खेळाडूंना कोट्योधीस तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली आहेत.
फ्रेंचाईजी दिग्गज तसेच नवखे प्रतिभावान क्रिकेट खेळाडू टीम मध्ये घेण्यास निलामी दरम्यान बोली लावतात व खेडळूना आपल्या खेम्यात शामील करून घेतात. आजपर्यंत आयपीएल चे एकूण सोळा हंगाम आयोजित झाले आहेत. पहिल्या हंगामाचे फायन्यालिस्ट राजस्थान रॉयल्स (RR) व चेन्नई सुपर किंग्ज (CSK) दरम्यान खेळण्यात आला व IPL "Indian Premier League" पहिला खिताब राजस्थान रॉयल्सने पटकावला.
आजपर्यंत सात फ्रेंचाईजीनी Indian Premier League (IPL) ट्रॉफीवर नाव कोरले असून, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (प्रत्येकी पाच वेळा), कोलकाता नाईट रायडर्स (दोन वेळा), राजस्थान रॉयल्स,डेक्कन चार्जेस, सनराईस हैद्राबाद, गुजरात टायटन्स (प्रत्येकी एक वेळा). चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघांचे प्रभुत्व बघायला मिळाले आहेत.
अनेक खेळाडू आयपीएल मुळे राष्ट्रिय संघात निवड झाल्यास बघायला मिळाले आहेत. तर काही दिग्गज तसेच नवखे प्रतिभावान फलंदाज अपयशी ठरले. नवख्या खेळाडूंना प्रतिभा दाखवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म IPL (Indian Premier League) मुळे उपबध झाला आहे.
IPL अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
एका हंगामात सर्वाधिक रन विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) च्या नावावर असून 2016 मध्ये 972 रन केले होते. विकेट घेण्यातच्या बाबतीत द्वेन ब्रावो : चेन्नई सुपर किंग्ज (2013) आणि हर्षल पटेल : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (2021) प्रत्येकी 32 विकेट आहेत. सर्वाधिक 59 षटकार क्रिस गेल : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (2012) यांच्या नावावर असून, 88 चौकार डेविड वॉर्नर : सनराईज हैद्राबाद (2016) एका हंगामात मारले होते.