मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना : महिला व बालविकास मंत्रालय महाराष्ट्र शासन, अंतर्गत महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि दैनंदिन पोषणामध्ये सुधारणा, राहणीमान उंचवावे, कुटूंबातील निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी दिनांक : २८ जून २०२४ मध्ये या योजनेस मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना e-KYC प्रक्रिया राबवित असतांना लाभार्थ्याकडून पर्याय निवडतांना संभ्रम असल्यामुळे e-KYC करतांना चुका झाल्या असल्यास त्यांनी पुन्हा एकदा नव्याने e-KYC करून दिनांक : ३१ मार्च २०२६ पर्यंत चूक दुरुस्ती करावी.
टीप :- ही सुविधा फक्त ज्या महिलांची e-KYC करतांना चुकीचा पर्याय निवडला असेल त्यांनाच देण्यात आला आहे.
