National Education Policy 2023-24 नवीन शैक्षणिक धोरण, चार वर्षात मिळणार दोन पदव्या 'एन्ट्री आणि एक्झिट' चा पर्याय.
New Education Policy 2023
नवीन शैक्षणिक धोरण २०२३-२४ पासून अंमलबजावणी करण्यात येणार असून, नवीन शैक्षणिक सत्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीने होणार आहे. विज्ञान व माहिती तंत्रज्ञान, व्यवसायिक अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे. 34 वर्षे जुन्या शैक्षणिक धोरणात आमुलग्र बदल घडवून आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसायिक शिक्षण घेण्यास सुलभ व सर्व समावेशक बनवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
जुने शैक्षणिक धोरण शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकच विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागत होता, तो एका विषयाचे बांधिल झाल्यासारखे वाटायला लागले होते. 'National Education Policy-2023' नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना एक्झिट चा पर्याय असल्याने बुध्दीमत्ते नुसार प्रवेश घेतील व बाहेर पडू वाटल्यास ते बाहेर पडतील, बाहेर पडण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे.
बारावीनंतर कला, विज्ञान व वाणिज्य शाखेचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा आवडीच्या विषयात कौशल्य विकास कोर्स सुद्धा करता येणार आहे, राज्यातील सर्व विद्यापीठात (कृषी विद्यापीठे सोडून) 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहेत. "New Education Policy 2023-24"
प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षानंतर बाहेर पडायचे असेल तर Exit चा पर्याय निवडायचा आणि विद्यार्थ्यांना एका वर्षाचे "Certificate" मिळेल. दुसऱ्या वर्षी बाहेर पडायचे असल्यास "Diploma" आणि तिसऱ्या वर्षी बाहेर पडायचे असल्यास विद्यार्थ्यांना "Deegree" प्रमाणपत्र मिळेल. पण, चौथ्या वर्षानंतर विद्यार्थ्यांना एका विषयात संशोधन करण्याची संधी मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
संशोधन निवडल्यास विद्यार्थ्यांना Ph.D करता येणार आहेत. चार वर्षाच्या शैक्षणिक कालावधीत विद्यार्थ्यांना दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचे स्वातंत्र्य असेल. new education policy 2023 implementation चौथ्या वर्षी विद्यार्थ्यांना शेवटच्या सहा महिन्यात त्यांच्या आवडीच्या विषयात कौशल्य आणि व्यवसाया विषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमात आता व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व दिले असून त्यात आधुनिक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, साहित्य व्यवसाय यांची सांगण असणार आहेत.