PM kisan : पीएम किसान सम्मान निधी योजना भारत सरकार कडून 2019 साली सुरू करण्यात आली होती. त्याच्या 14 वा हफ्ता या महिन्यात वितरित करण्यात येणार.
PM KISAN
Pm kisan योजनेचा चौदावा हफ्ता दिनांक: 27 किंवा 28 जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. एकूण 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 19 कोटी रुपये जमा होणार असून शेतकऱ्यांनी अटी व पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. PM KISAN 14 Installment Update
केंद्र शासनाने तीन बाबी बंधनकारक केल्या असून पीएम किसान 'PM KISAN' योजनेचा चौदाव्या हफ्त्याचा लाभ घेण्यासाठी पूर्ण करणे आवश्यक आहे. बंधनकारक करण्यात आलेल्या तीन ठळक बाबी खालीलप्रमाणे -
✴️ बाब क्रमांक एक :
बाब :- राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्यावत करणे (Land Seeding - No)
कार्यवाही :- आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित तालुका कृषी अधिकारी. pm kisan ekyc status check online
जबाबदारी :- कृषी अधिकारी
✴️ बाब क्रमांक दोन :-
बाब :- "PM Kisan" पीएम किसान e-kyc प्रमाणीकरण करणे (e-kyc Done - No)
कार्यवाही :- पीएम किसान पोर्टलवरील फॉर्मर कॉर्नर मधील e-kyc OTP based सुविधेद्वारे e-kyc प्रमाणीकरण करून घेणे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत (Commen Service Center) CSC किंवा केंद्र शासनाच्या PM Kisan App च्या मदतीने चेहरा प्रमाणीकरण (Face Detection)
जबाबदारी :- संबधित लाभार्थी (शेतकरी)
Pradhan Mantri Fasal Bima प्रधानमंत्री पिक विमा योजना लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा...
✴️ बाब क्रमांक तीन :-
बाब :- बँक खाते आधार संलग्न करणे (Aadhar Seeding With Bank Account)
कार्यवाही :- बँकेत जाऊन बँक खात्यास आधार संलग्न करून घ्यावे (Aadhar Seeded) किंवा पोस्ट मास्टर यांच्यामार्फत India Post Payment Bank खाते उघडून घ्यावे.
जबाबदारी :- संबधित लाभार्थी (शेतकरी)
पीएम किसान PM KISAN योजनेचा 14 वा हफ्ता दिनांक : 28 जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार असून, वरील बाबी पूर्ण केल्यास लाभार्थ्यास लाभ मिळेल अन्यथा लाभापासून वंचित राहू शकतो.