गोठा काँक्रीटीकरण योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, शरद पवार ग्राम समृद्धी योजना, कृषी विभाग योजना, पशुधन विकास विभाग महाराष्ट्र शासन, गाय/म्हैस गोठा काँक्रीटीकरण योजना, शरद पवार ग्राम समृद्धी योजना.
गोठा काँक्रीटीकरण
गाय म्हैस गोठा योजना : शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गाय/म्हैस गोठा काँक्रीटीकरण बांधकाम अनुदानासाठी राबवण्यात येणार आहे. 2 (दोन) गाय किंवा 2 (दोन) म्हैस किंवा 30 (तीस) शेळ्यांसाठी गोठा काँक्रीटीकरण करण्यास 77,188/- रुपये अनुदान देण्यात येते. 6 (सहा) पेक्षा अधिक गुरांसाठी म्हणजेच 12 (बारा) गुरांसाठी एक गोठा बांधण्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाईल. 'Sharad Pawar Gram Samrudhi Yojana' महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागात जनावरांचे आरोग्य, स्वच्छ्ता याकडे विशेष लक्ष असल्याने आता, गाय म्हैस गोठा बांधण्यास जनावरांच्या संख्येनुसार अनुदान देण्यात येणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक राहिल.
1) शरद पवार ग्राम समृद्धी गाय/म्हैस गोठा प्रस्ताव.
2) ग्रामसभा ठराव नक्कल.
3) आधार कार्ड.
4) बँक पासबुक.
5) जॉब कार्ड.
6) सातबारा किंवा वनपट्टा.
7) नमूना नंबर 8-अ.
8) जात प्रमाणपत्र.
9) दारिद्र्य रेषेखालील दाखला.
10) रेशन कार्ड.
11) मतदान कार्ड.
12) नमुना नंबर 8.
13) चार पासपोर्ट फोटो.
14) पशुसंवर्धन विभागाचा दाखला.
15) कृति आराखड्यात नाव असल्यास त्याची सत्यप्रत.
16) रहिवासी स्वयंघोषणापत्र. "sharad pawar gram samrudhi yojana"
17) कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र.
18) शासकिय सेवेत नसल्याचे स्वयंघोषणापत्र.
19) शिफारस पत्र.
वरिल कागदपत्रे दिल्याप्रमाणे प्रस्तवासोबत जोडून शरद पवार ग्राम समृद्धी योजना (महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गाय/म्हैस गोठा बांधकाम) ग्रामपंचायती मार्फत पंचायत समितीस सादर करावे.