Ladki bahin.maharashtra.gov.in, ladki bahin beneficiary list download, Ladki bahin e-KYC, ladki bahin list, ladki bahin ekyc, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana e-KYC, MMLBY, PESA Certificates, Majhi Ladki Bahin Yojana Official Website, Ladki bahin status check online, e-KYC, Woman and Child Development Department, Government of Maharashtra.
MMLBY e-KYC
MMLBY : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले असून, महिला लाभार्थींना निरंतर लाभ सुरु रहावा यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक (केवायसी) आहे. लाडकी बहीण e-KYC करण्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" थेट लाभ हस्तांतरण DBT (Direct Benefit Transfer) असल्याने बँक खाते आधारची लिंक असावे. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत महाराष्ट्रातल्या महिलांची आर्थिक स्थिती, स्वातंत्र्य, चांगले आरोग्य, राहणीमान उंचवावे यासाठी सुरु करण्यात आली.
Mukhtamantri Majhi 'Ladki Bahin Yojana e-KYC' अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करावयाची आहे. लाडकी बहीण योजना केवायसी करण्यासाठी "www.ladkibahin.maharashtra.gov.in" या अधिकृत संकेतस्थळावर करायची आहेत.
लाडकी बहीण केवायसी कशी करायची? केवायसी करतांना येणाऱ्या समस्या? केवायची कुठे करता येईल? e-KYC कोण करु शकेल? ladki bahin ekyc माहिती कशी प्रविष्ट करायची? कोणते पर्याय निवडायचे?असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, अशा सर्व प्रश्नांची शहानिशा या लेखात करणार आहोत. त्यासाठी संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप खालीलप्रमाणे-
● Step 1 :- सर्व प्रथम मोबाईल मध्ये Chrome किंवा इतर ब्राउझर उघडा आणि सर्च बॉक्स मध्ये "ladkibahin.maharashtra.gov.in" असे टाईप करा व प्रदर्शित पहिल्या वेबसाईट वर क्लिक करा. (खालील फोटो मध्ये पहा)
● Step 2 :- प्रदर्शित पहिल्या वेबसाईट वर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत संकेतस्थळ उघडेल त्यात "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे" या टॅब किंवा दुव्यावर क्लिक करा. (खालील फोटो मध्ये पहा)
● Step 3 :- e-KYC टॅबवर क्लिक केल्यानंतर प्रथमतः लाभार्थी आधार क्रमांक दिलेल्या रकान्यात प्रविष्ट करा, व कॅप्चा जसाचा तसा सारखाच रकान्यात प्रविष्ट करा. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी "मी सहमत आहे" या बटणावर टॅप करणे आणि "ओटीपी पाठवा" या बटणावर क्लिक करा. (खालील फोटो मध्ये पहा)
● Step 4 :- OTP पाठवा या बटणावर क्लिक केल्यानंतर लाभार्थी महिलेच्या आधारची लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर सहा अंकी OTP (One Time Password) येईल. ओटीपी काळजीपूर्वक रकान्यात प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
महत्वाची सूचना :- जर दिलेल्या वेळेत म्हणजेच दहा मिनिटांत ओटीपी आला नाही तर पुन्हा otp साठी "OTP पुन्हा पाठवा" यावर क्लिक करा. (खालील फोटो मध्ये पहा)
● Step 5 :- लाभार्थी महिलेचा ओटीपी सबमिट झाल्यानंतर वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांकप्रविष्ट करा आणि कॅप्चा कोड जसाचा तसा एंटर करा. आधारप्रमाणीकरण करण्यास सहमती देण्यासाठी "मी सहमत आहे" या टॅबवर क्लिक करुन, "OTP पाठवा" बटणावर क्लिक करा.(खालील फोटो मध्ये पहा)
● Step 6 :- लाभार्थी महिलेच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधारची लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP मेसेज बॉक्स मध्ये येईल. दिलेल्या रकान्यात प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
महत्वाची सूचना :- जर दिलेल्या वेळेत म्हणजेच दहा मिनिटांत ओटीपी आला नाही तर "OTP पुन्हा पाठवा" यावर क्लिक करा. (खालील फोटो मध्ये पहा)
● Step 7 :- वडिलांचे किंवा पतीचे आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव आधार वरचे नाव दिसेल तदनंतर लाभार्थी महिलेची "जात प्रवर्ग" निवडायचे आहेत. विचारलेलं होन्ही पर्याय "होय" करायचे व चेक बॉक्स वर क्लिक करुन सबमिट बटणावर क्लिक करा.
● Step 8 :- लाभार्थी महिलेची माहिती सबमिट झाल्यावर "Success - तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे" अशी सूचना तुमच्या स्क्रीन वर दिसेल व लाभार्थी महिलेची ई-केवायसी पूर्ण होईल.








