10 वी (SSC) व 12 वी (HSC) चा निकाल लागला की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेशासाठी कागदपत्रे काढण्यासाठी धावा-धाव सुरू होते.
Certificate of Age, Domicile and Nationality
उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, आणि 'वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र Certificate of Domicile and Nationality' असे अनेक दाखले शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असतात. ग्रामीण क्षेत्रात तर कागदपत्रे मिळवणे खूप जिकरीचे होऊन जाते.
अर्ज भरणे, फॉर्मवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची सह्या घेणे, जमा करणे अशा कसरती कराव्या लागतात. त्यातच काही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना अर्जासोबत कुठली कागदपत्रे जोडायचे याची माहितीच नसते.
आज एका शैक्षणिक कागदपत्राची म्हणजेच वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला Certificate of Age, Domicile and Nationality विषयी सखोल माहिती बघणार आहोत. मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.
प्रथमतः एक अर्ज महा ई सेवा केंद्र किंवा सेतू मधून घ्यायचे आहेत. वैयक्तिक माहिती, पत्ता, व्यवसाय, सध्याचे अधिवास ठिकाण, रहिवासी ही माहिती काळजीपूर्वक भरा.
वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (दाखला) फॉर्म वर कोणत्याही प्रशासकिय अधिकाऱ्यांची सही लागत नसल्याने दाखला काढण्यास अडचड येत नाही. तसेच पुरावा म्हणून अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडायचे आहे.
👉🏻 1) आधार कार्ड.
2) जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
3) रेशन कार्ड.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
वरील प्रमाणे दिलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडून महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतू मध्ये जमा करायचे आहेत. "Domicile and Nationality Certificate" अर्जावर अर्जदाराची सही लागत असेल तिथे सही/अंगठा कराव्या आणि जोडलेल्या प्रत्येक सत्यप्रतीवर अंगठा किंवा सही करणे.