"नमो शेतकरी महासन्मान योजना" PM-KISAN योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार १२,०००/- रूपये.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना PM-KISAN अंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपयाचे लाभ मिळत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आणखी सहा हजार रुपयाची भर पडली असून, वर्षाकाठी एकूण 12,000/- रूपये मिळतील. PM Kisan ekyc झाली असेल त्याच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 'Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana'
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नमो शेतकरी महासन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली असून आता महाराष्ट्र राज्यांतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
सध्या 1.15 कोटी शेतकरी कुटूंबांना योजनेचा फायदा होणार असून, योजनेपोटी महाराष्ट्र शासनाला 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 6,900/- कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले जात आहे.
मागच्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून हप्ते वितरीत करण्याची प्रक्रिया प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजने प्रमाणेच राहील.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
✴️ हफ्ते वितरण कालावधी :-
1) पहिला हफ्ता :- एप्रिल ते जुलै
2) दुसरा हप्ता :- ऑगस्ट ते नोव्हेंबर
3) तिसरा हफ्ता :- डिसेंबर ते मार्च
✴️ पात्रता :-
1) प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचे लाभ मिळत असलेले महाराष्ट्रतील सर्व शेतकरी.
2) PM-KISAN पोर्टल वर नवीन नोंदणी केलेले व मान्यता मिळालेले महाराष्ट्रातील सर्व शेतकरी.
3) केंद्र शासनाच्या पात्रता निकषात बसत असलेले महाराष्ट्रतील सर्व शेतकरी.
✴️ कार्यप्रणाली :-
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा "Namo Shetkari Sanman Nidhi Yojana" निधी वितरीत करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यात आहेत व सनियांत्रणासाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.