Aadhar and Pan Card Link आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांची लिंक करण्याची तारिख जवळ येत आहे, ज्यांनी लिंक केले नसेल त्यांनी 30 जुन 2023 रोजी पर्यंत करून घ्या.
Aadhar Pan Card Link
भारत सरकार कडून भारतीय नागरिकांना वेळोवेळी तारिख वाळवून दिली असली तरी यावेळेस वाढीव वेळ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहेत, परंतु 30 जुन 2023 रोजी कळेलच या विषयी भारताचे अर्थमंत्री काय निर्णय घेतात.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड 'Aadhar Pan Card Link' एकमेकांची लिंक करण्याची मोहीम हाती घेण्यास बरास कालावधी झाला असून नागरिकांना सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमाने तसेच समाजमाध्यमाद्वारे जनजागृती करून ही काही नागरिकांनी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही.
पॅन कार्ड आधार कार्ड "Pan Aadhar Card Link" ची लिंक केले नाही तर पॅन कार्ड अवैध ठरेल आणि त्यामुळे नागरिकांना मोठं नुकसान देखील होऊ शकते, कारण पॅन कार्ड अवैध ठरल्यास त्या कालावधीसाठी आयकर परताव्यावर कुठलेही व्याज दिले जाणार नाही, आणि टीडीएस (TDS) व टीसएस (TCS) कपातीवर उच्च व्याज दर लागू केला जाऊ शकतो.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड कसे लिंक करावे? How to link Aadhar Card with Pan Card? आधार कार्डची पॅन कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया एकदम सोपी असून भारतीय नागरिक स्वतः च्या मोबाइलद्वारे ही करू शकतात. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आधारची लिंक असलेले मोबाईल क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे.
आधार-पॅन लिंक करण्यासाठी Income Tax Dept. च्या वेबसाईट वर जायचे आणि link Option निवडा व पेज ओपन झाल्यानंतर Link Aadhar या टॅब वर क्लिक करा. नंतर आवश्यक माहिती रकान्यात प्रविष्ट करा. पेमेंटचा पर्याय विचारला जाईल, पेमेंट झाल्यानंतर सबमिट करा.
👇🏻