FIFO System (First In First Out) : फिफो प्रणाली द्वारे शैक्षणिक तसेच नोकरी साठी जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, अधिवास, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमीलेअर असे अनेक प्रकारचे दाखले आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रात विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्यास विलंब होणार नाही.
FIFO SYSTEM
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग यांच्या प्राप्त निर्देशानुसार महसूल विभागात 'FIFO System' फिफो प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. याचे पडसाद महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात बघायला मिळताहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू झाली असून महाराष्ट्र राज्यातील सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
विविध दाखले काढण्यासाठी नागरिकांना रांगेत उभे राहून त्रास सहन करून सुद्धा दाखले मिळण्यास उशीर व्हायचा. सध्या फिफो प्रणाली मुळे दलाल वृत्तीला चाप बसणार असल्याचेही सांगितले जात आहे. आधी ओळखीच्या व्यक्तीचे काम लवकर व्हायचे पण आता याला आळा बसणार आहेत, कारण "FIFO System" मुळे ज्यांचा अर्ज पहिले आला त्यांच्याच अर्ज निकाली काढावा लागेल.
FIFO System फिफो प्रणाली पूर्पपणे कार्यान्वित झाल्यास प्रशाकिय यंत्रणेत सुसूत्रता व दिलेल्या कालावधीत विद्यार्थांना व नागरिकांना दाखले मिळणार असल्याने, वणवण भटकत फिरावे लागणार नाही.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
महाराष्ट्र शासनाने प्रत्येक दाखल्यांचे दर आणि दाखले मिळण्याचा कालावधी सुद्धा जाहीर केले असून, महाराष्ट्रातील प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र (Fifo System) आणि महा ई सेवा केंद्र चालकाने याची अंमलबजावणी करावी असे निर्देश महसूल विभागकडून मिळाले आहेत. दर व कालावधी खालीलप्रमाणे-
उत्पन्न दाखला : शुल्क 35 रु. कालावधी सात दिवस, रहिवासी दाखला : शुल्क 35 रु. सात दिवस, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला : शुल्क 35 रु. सात दिवस, प्रतिज्ञापत्र : शुल्क 35 रु. त्याच वेळी, जात प्रमाणपत्र : शुल्क 100 रु. पंचेचाळीस दिवस, नॉन क्रिमीलेअर : शुल्क 100 रु. आणि एकविस दिवस.
👇🏻