PESA CERTIFICATE : पेसा रहिवासी दाखला नसेल तरी भरू शकणार तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज...
Pesa Declaration Talathi 2023
Talathi Bharti 2023 साठी दिनांक : 26 जुन 2023 रोजी पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. त्यात पेसा क्षेत्रातील अर्जदारांना अर्ज भरतांना पेसा रहिवासी दाखला Pesa Resident Certificate अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले होते.
तलाठी भरतीसाठी नविन अपडेट आली असून आता पेसा क्षेत्रामध्ये अर्जदारांना पेसा दाखल्याशिवाय अर्ज भरता येणार आहेत. 'pesa dakhala update' महसूल विभागाकडून पेसा क्षेत्रामध्ये पेसा रहिवासी दाखला काढण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, त्यात ग्रामीण क्षेत्रात गाव ते प्रकल्प कार्यालय खूप दूर आहेत.
महसूल विभागाकडून अधिकृत संकेतस्थळावर सूचना जाहीर करण्यात आली असून "Pesa Resident Certificate" पेसा रहिवासी दाखल्याला पर्याय म्हणून कागदपत्रे अपलोड करतांना पेसा दाखला च्या जागी पुढील कागदपत्रे अपलोड करणे बाबत.
शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) किंवा रहिवासी दाखला (Resident Certificate) किंवा स्वयंघोषणापत्र (Self Attested Resident Certificate) अपलोड करण्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहेत.
तलाठी भरती (Talathi Bharti 2023) आणि अनिवार्य कागदपत्रांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा...
ज्या उमेदवारांची अंतिम निवड झाल्यास (कागदपत्रांची पडताळणी वेळी) क्षेत्रामध्ये अर्जदारांना पेसा रहिवासी दाखला PESA CERTIFICATE सादर करणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे.