Tribal Development Department : आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
Hostel Registration Form Fill
आदिवासी मुला-मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्या यासाठी वस्तीगृह प्रवेश नवीन व नूतनीकरण 'How to Apply Online Registration New and Renewal Form Fill' प्रक्रिया सुरू झाली आहे. याचा लाभ जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांनी घ्यावा. विद्यार्थांनी ऑनलाईन फॉर्म भरतांना आवश्यक माहिती कशी भरायची याची स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती खालीलप्रमाणे-
➤ Registration :-
सुरवातीला www.swayam.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन वर क्लिक करा, आधार क्रमांक, आधार कार्ड नुसार नाव, जन्म तारिख, लिंग, युजर आयडी (स्वतः चा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा) आणि पासवर्ड तयार करा व कॅपचा कोड प्रविष्ट करून सबमिट करा.
➤ Login :-
रजिस्ट्रेशन करतेवेळी दिलेले युजर आयडी (स्वतः मोबाईल क्रमांक) आणि तयार केलेला पासवर्ड टाकून लॉगिन करा. आधार व्हेरिफिकेशनसाठी विचारले जाईल आधार क्रमांक रकान्यात प्रविष्ट करा आणि आधार कार्डची लिंक असलेल्या मोबाईल वर otp येईल तो प्रविष्ट करून सबमिट करा व आधार व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्याची सूचना येईल. नंतर मेनू वर क्लिक करा आणि Application टॅब निवडा. Swayam Mahaonline Hostel Registration Form Step by Step Process
1) Applicant Details :-
अर्जदारांची वैयक्तिक माहिती द्यायची असून अर्जदारांचे पूर्ण नाव, वडीलांचे व आईचे नाव रकान्यात प्रविष्ट करा. अर्जदाराचे जन्म तारिख, आधार क्रमांक डिफॉल्ट ऑप्शन मध्ये दिसेल.
2) Correspondence Address Details :-
अर्जदाराचे पत्रव्यवहारासाठी तात्पुरता आणि कायमचा पत्ता विचारला जाईल. गाव, तालुका, जिल्हा, राज्य पिन कोड प्रविष्ट करा.
3) Permanet Address Details :-
सध्याचा व कायमचा पत्ता एकच असल्यास चेक बॉक्स वर अन्यथा गाव, तालुका, जिल्हा, राज्य, पिन कोड प्रविष्ट करा.
4) Contact Details :-
अर्जदाराची संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि वडीलांचे संपर्क क्रमांक देणे बंधनकारक आहे. 'आदिवासी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे'
5) Coste Details :-
यात जात प्रवर्ग, उप जात, आदिम जमात विचारले जाईल, योग्य तो पर्याय निवडा.
6) Other Details :-
इतर या टॅब मध्ये. अनाथ, उत्पन्न, BPL, EBC (असल्यास), जात प्रमाणपत्र क्रमांक, ऐच्चिक माहिती- जात पडतळणी, पॅन कार्ड, वडिलांचे आधार क्रमांक व पॅन कार्ड, आईचे आधार कार्ड व पॅन कार्ड.
7) Specially Abled Details :-
उपंगत्व असल्यास येस ऑप्शन निवडा नाही तर नो निवडा. अपंगत्व असल्यास, प्रकार, किती टक्के अपंगत्व विषयी माहिती प्रविष्ट करावी.
8) Current Admission Details :-
सध्याच्या प्रवेश सविस्तर माहितीत विभाग, प्रकल्प, स्थान, सध्याचा कोर्स, महाविद्यालयाचे नाव, कोर्स नाव, कालावधी, अभ्यासक्रमाचे वर्ष, डिप्लोमा नंतर प्रवेश असल्यास, दहावी नंतर प्रवेश असल्यास, शैक्षणिक वर्ष, प्रवेश दिनांक, शाखा, प्रवेश पावती क्रमांक असल्यास, मागील वसतिगृह प्रवेश असल्यास.
9) Hostel Details :-
सध्या कुठल्या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्या वसतिगृहाचे नाव निवडा. Document require for adiwasi hostel admission
10) Last Examination Details :-
मागील वर्षी दिलेल्या परीक्षेविषयी माहिती प्रविष्ट करा, शाळा किंवा महाविद्यालयाचे नाव, पत्ता, कोर्स, कोर्स कालावधी, मिळालेले गुण, एकूण गुण, टक्के आपोआप येतील, निकाल इत्यादी माहिती पुरवणे.
11) SSC Board Details :-
अर्जदार दहावीत कुठल्या बोर्ड ल होते त्याचे नाव निवडा, पासिंग वर्ष, महिना, बैठक क्रमांक प्रविष्ट करा.
12) Previous Hostel Details :-
मागील शैक्षणिक वर्षात वसतिगृहात राहत असल्यास त्याचे नाव, प्रवेश दिनांक, शेवटची तारिख मागील वस्तीगृह सोडल्याचे.
13) Bank Account Details :-
अर्जदाराचे बँक खाते पुस्तिकानुसार नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, शाखा नाव, आयएफएससी कोड. आधार क्रमांक बँक खात्याची लिंक आहे का विचारले जाईल. नसल्यास लिंक करावे. "हॉस्टेल ऍडमिशन साठी कागदपत्रे"
वरीलप्रमाणे सर्व स्टेप पूर्ण झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहेत.
➤ New and Renewal :-
नविन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना एकूण आठ कागदपत्रे आणि नूतनीकरणासाठी एकूण चार कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. "swayam maha online hostel registration form step by step process"
➤ Print :-
Documents Upload झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट आऊट काढून एका फाईल मध्ये फॉर्मची प्रिंट आणि आवश्यक झेरॉक्स कागदपत्रे जोडा व वस्तीगृह व्यवस्थापकाकडे सादर करावे.