Shabari Awas Scheme : शबरी आदिवासी घरकुल योजना, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन संपूर्ण माहिती, योजनेचे उद्दिष्ट्ये, लाभ, अनुदान, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, प्रस्ताव, आणि इतर संबंधित सर्व माहिती या लेखात बघणार आहोत.
शबरी आदिवासी घरकुल योजना
शबरी आदिवासी घरकुल योजना 'Shabari Adiwasi Gharkul Yojana' ही महाराष्ट्र आदिवासी उप- योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी पक्के घर उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अंमलात आणली आहेत. "शबरी आदिवासी घरकुल योजना"
शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना घरकुल व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय Toilet बांधण्यास स्वंतत्र आर्थिक मदत देण्याचे देखील तरतूद करण्यात आली आहे.
शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करतांना ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि प्रकल्प कार्यालय किंवा ग्रामीण विकास यंत्रणा योग्य ती कार्यवाही करुन मंजूरी देण्यात येते.
शबरी आदिवासी घरकुल shabari adiwasi gharkul योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना स्वतः ची राहण्यासाठी पक्की घरे नाहीत, त्यांना पक्की घरे उपलब्ध करुन देणे. शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटूंबांना नवीन पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य सरकारकडून देण्यात येते.
सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी एकूण 1.20 रुपये (एक लाख वीस हजार रुपये) इतकी रक्कम टप्प्या-टप्याने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते.
तसेच मनरेगा (MGNREGA) च्या माध्यमातून शबरी आदिवासी घरकुल योजना shabari adiwasi gharkul yojana लाभार्थ्यास 21,000 रुपये (एकवीस हजार रुपये (कालांतराने या रक्कमेत बदल शक्य)) रोजगार देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शबरी आदिवासी घरकुल योजना लाभार्थ्यास लाभ घेण्यासाठी खालील कागदपतत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
1) अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट फोटो
2) ग्रामसभा ठराव
3) जातीचा दाखला
4) उत्पन्न दाखला (चालु आर्थिक वर्षातील)
5) यापुर्वी घरकुल योजनाचे लाभ न घेतल्याचा ग्रामसेवक दाखला
6) सातबारा किंवा वनपट्टा किंवा नमुना 8 (अ)
7) घरपट्टी व पाणीपट्टी कर भरणा केल्याची पावती
8) हमीपत्र (100 रुपयाचे स्टॅम्पपेपर वर)
9) मतदान कार्ड
10) रेशन कार्ड
11) रहिवासी दाखला
12) आधार कार्ड
13) बँक पासबूक
14) जॉब कार्ड
15) शासकिय योजनांचे लाभ न घेतल्याचा दाखला
16) कोणत्याही योजनांचे लाभ न घेतल्याचा दाखला
शबरी आदिवासी घरकुल योजना "shabari adiwasi gharkul yojana" अंतर्गत लाभ वरील कागदपत्रे प्रस्तवासोबत एका फाईलमध्ये ग्रामपंचायत कार्यालात जमा करावे.