MahaTET 2026
Maha TET : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २१ जून २०२६ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, पात्र उमेदवारांनी MahaTET च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा.
१. आवेदनपत्र :- महा-टीईटी परिक्षा २१ जून २०२६ करिता दिनांक : २७ मार्च २०२६ ते दिनांक : २४ एप्रिल २०२६ रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. Candidate Login
२. आवश्यक कागदपत्रे (Document) :- महा टेट परीक्षेचा ऑनलाईन अर्ज करतांना शैक्षणिक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
● एसएससी गुणपत्रक/प्रमाणपत्र (SSC)
● एचएससी गुणपत्रक/प्रमाणपत्र (HSC)
● पदवी गुणपत्रक (Graduation)
● पदव्यूत्तर गुणपत्रक (Post Graduation)
● व्यावसायिक प्रशिक्षण गुणपत्रक (D.ed/ B.ed)
● जात प्रमाणपत्र (Coste Certificate) राखीव असल्यास
● आधार कार्ड (Aadhar Card)
● दिव्यांग प्रमाणपत्र (Handicapped Certificate) (दिव्यांग असल्यास)
● मोबाईल नंबर (Mobile No) व ईमेल आयडी (E-mail ID) अनिवार्य.
३. अनिवार्य कागदपत्रे :- ऑनलाईन अर्ज सादर करणे करिता अपलोड करण्यासाठी अनिवार्य कागदपत्रे पुढीलप्रमाणे-
● छायाचित्र (Passport Photo) १७ KB - ५१ KB JPG फॉरमॅट मध्ये.
● स्वाक्षरी (Signature) १७ KB - ५१ KB JPG फॉरमॅट मध्ये.
3. ओळख पुरावा (Identity Proof) ३० KB - ५०० KB PDF फॉरमॅट मध्ये.
● स्व-हस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्र (Self Declaration) १७ KB - ५०० KB JPG फॉरमॅट मध्ये.
● माजी सैनिक प्रमाणपत्र (Ex - Serviceman) ३० KB - ५०० KB PDF फॉरमॅट मध्ये. (लागू असल्यास)
● नावात बदल असल्याचे प्रमाणपत्र (Name Change Certificate) १७ KB - ५०० KB JPG फॉरमॅट मध्ये. (लागू असल्यास)
४. फि (Fees) :- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २१ जून २०२६ साठी परीक्षा शुल्क आकारले जाणार असून, उमेदवारांनी ऑनलाईन भरणा करणे आवश्यक आहे.
●अनुसूचित जमाती (ST)/अनुसूचित जाती (SC)/विकलांग (For Handicapped Candidate) पेपर - १ रुपये ७००/- आणि दोन्ही पेपर रुपये ९००/-
● इतर मागासवर्गीय उमेदवार/ खुला गट पेपर - १ रुपये १०००/- आणि दोन्ही पेपर रुपये १२००/-
५. स्व-हस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्र (Self Declaration) :- महा टेट परीक्षेचा अर्ज करतेवेळी उमेदवारांना स्व-हस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्र कोऱ्या कागदावर स्वतः च्या अक्षराने लिहून अपलोड करणे बंधनकारक आहे.
प्रतिज्ञापत्र
मी ......(उमेदवारांचे नाव)......., प्रतिज्ञापूर्वक घोषित करतो/करते की, मी या अर्जात नमूद केलेली सर्व माहिती अचूक व वस्तुस्थितीवर आधारित आहे. सदर परीक्षा ही शिक्षक पात्रता परीक्षा असून यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता संपादित केली असल्याने मी या परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी आवेदन पत्र सादर करीत आहे. या अर्जात नमूद केलेल्या माहिती मध्ये कोणताही बदल करता येणार नाही. यांची मला जाणीव आहे. भविष्यात जर चुकीची किंवा खोटी माहिती आढळून आल्यास सदर परीक्षेचा माझा प्रवेश व संपादणुक रद्द होईल तसेच पुढील कायदेशीर कारवाईस मी पात्र राहीन याची मला जाणीव आहे.
मी वरील प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक वाचले आहे व ते मला मान्य आहे.
६. प्रवेशपत्र (Admit Card) :- महा टेट - २०२६ प्रवेशपत्र दिनांक : ९ जून २०२६ ते दिनांक : २१ जून २०२६ दरम्यान उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.
७. परीक्षा (Examination) :- महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक : २१ जून २०२६ (रविवार) रोजी दोन सत्रात होणार असून, वेळ खालीलप्रमाणे -
● Pepar I :- 10:30 AM to 1:00 PM.
● Pepar II :- 02:30 PM to 5:00 PM.
Maha TET 2026 परीक्षा २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली असून, महा टीईटी परीक्षा निगडित माहिती Maha TET च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. Maha TET
