ZP Election and PS Election 2025, Zilla Parishad and Panchayat Samities, Jilha Parishad Election 2025, Panchayat Samiti Election 2025, Joint Election Jilha Parishad and Panchayat Samiti Election 2025, Panchayat Raj Ministry Goverment of Maharashtra.
ZP and PS Election - 2025
महाराष्ट्र निवडणूक आयोग "Election Commission of Maharashtra" : महाराष्ट्र राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३६ पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
प्रारुप मतदार यादीवर दिनांक : ८ ऑक्टोंबर २०२५ ते दिनांक : १४ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान हरकती आणि सूचना दाखल करता येतील.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्यावेळी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी पुढील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद निवडणूक विभाग (गट) व पंचायत समिती गणनिहाय प्रारुप मतदार यादी दिनांक : ८ ऑक्टोंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर दिनांक : १४ ऑक्टोंबर २०२५ रोजी पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक - २०२५ अंतिम यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी दिनांक : २७ ऑक्टोंबर २०२५ रोजी जाहिर केली जाईल.
निवडणुक विभाग (गट) व निर्वाचक गणनिहाय मतदार यादी तयार करतांना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदाराची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. Zilla Parishad and Panchayat Samiti Election - 2025
या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे, नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरुपाची कार्यवाही राज्य निवडणुक आयोगाकडून केली जात नाही.
हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करतांना लेखानिकांकडून होणाऱ्या चुका किंवा मतदारांचा चुकून विभाग गट व निर्वाचन गण बदलणे.
विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे इत्यादी संदर्भातील दुरुस्त्या, हरकती करणे आणि सूचनांच्या अनुषंगाने दुरुस्ती किंवा बदल करण्यात येत असतात. ZP and PS Election

