Maharashtra State Zilla Parishad and Panchayat Samiti Election 2025, ZP Election 2025, Zilla Parishad Election Time Table 2025, Namination Later for Jilha Parishad Panchayat Samiti Election 2025, New Voter Card Registration, Election Commission of Maharashtra, Jilha Parishad Election 2025, Mini Vidhansabha Nivadanuk, Bihar Assembly Elections 2025.
जिल्हा परिषद व पंचायत समिती
Election 2025 : महाराष्ट्रात मिनी विधानसभा म्हणून "जिल्हा परिषद व पंचायत समिती" निवडणूकीकडे पाहिले जाते. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद 'Jilha Parishad' व पंचायत समिती 'Panchayat Samiti' निवडणूक कार्यक्रम - २०२५ जाहीर केला असून, मतदान दिनांक : २९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहे. इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन नामनिर्देशनपत्र, प्रतिज्ञापत्र, वैयक्तिक आणि शैक्षणिक अर्हता प्राप्त कागदपत्रे दिलेल्या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी कडे सादर करायचे आहे.
● वेळापत्रक :- 'जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम - २०२५' "Zilla Parishad and Panchayat Samiti Election - 2025" वेळापत्रक खालीलप्रमाणे दिले आहेत.
१. नामनिर्देशन प्रक्रिया :
दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२५ पासून ते दिनांक : ११ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन किंवा अर्ज दाखल करण्याचा कालावधी देण्यात आला आहे.
२. नामनिर्देशनपत्र पडताळणी :
दिनांक : १२ नोव्हेंबर २०२५ पासून ते दिनांक : १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलेले नामनिर्देशन किंवा अर्ज चाळणी करण्यात येणार आहे.
३. माघार :
दिनांक : १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी एका दिवसाचा वेळ असणार आहे.
४. प्रचाराची रणधुमाळी :
दिनांक : १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पासून ते दिनांक : २७ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत प्रचाराचा धुरा उडणार आहे.
५. मतदान :
दिनांक : २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून सकाळी ७:०० वाजता प्रत्यक्ष मतदानास सुरवात होईल व संध्याकाळी ५:०० वाजे पर्यंत सुरु राहील.
६. निकाल :
दिनांक : ०१ डिसेंबर २०२५ रोजी "जिल्हा परिषद" व "पंचायत समिती" निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
● पात्रता व अपात्रता :- "भारत निवडणूक आयोग" तथा "महाराष्ट्र निवडणूक आयोग" यांच्या मार्फत निवडणूकी संदर्भात पात्रता व अपात्रता निकष ठरविण्यात आले आहेत.
१. नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अंतिम दिनांकास त्या व्यक्तीचे किंवा उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे असणे.
२. उमेदवार भारताचा नागरिक (Indian Citizen) असावा.
३. विद्यमान जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट केलेले असावे.
४. कोणत्याही कायद्याखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र ठरविण्यात आले नसावे.
५. दोन पेक्षा अधिक अपत्य असल्यास अपात्र असेल. (दिनांक : १२ सप्टेंबर २००१ नंतर)

