Maha FYJC
Maha FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, सध्या भाग - १ भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अकरावीत (First Year Junior College) प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भाग - १ ची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
दिनांक : १० एप्रिल २०१६ सकाळी १०:०० वाजेपासून ते दहावी निकाल जाहीर होईपर्यंत भाग - १ विद्यार्थ्यांना भरता येणार आहेत. भाग - २ हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे (इयत्ता दहावी) निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे : १० वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज करण्याकरिता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
१. इयत्ता १० वी शाळा सोडल्याचा दाखला (LC).२. इयत्ता १० वी गुणपत्रक (Marksheet).३. जातीचा दाखला (Coste Certificate).४. हमीपत्र (Undertaking).
Maha FYJC Admission
संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही शेवटचा विद्यार्थी प्रविष्ट होईपर्यंत गुणवत्तेनुसार ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. ऑनलाईन प्रणाली व्यतिरिक्त अन्य प्रणालीमधून एकही प्रवेश शाळा व्यवस्थापनास करता येणार नाही. Maharashtra State FYJC Online Admission
Maha FYJC Admission
