Maha FYJC
Maha FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अकरावीत "FYJC" प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भाग - १ व भाग - २ ची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
दिनांक : १० एप्रिल २०१६ सकाळी १०:०० वाजेपासून ते दहावी निकाल लागेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने भाग - १ भरणे सुरु होते. दहावीचा निकाल जाहीर झाला असून, भाग - १ व भाग - २ ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
● आवश्यक कागदपत्रे : १० वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज करण्याकरिता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
१. शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate).
२. गुणपत्रक (Marksheet).
३. जातीचा दाखला (Coste Certificate).
४. हमीपत्र (Undertaking).
● प्रवेश प्रक्रिया : अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली शून्य फेरी व नियमित फेरीचा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
● शून्य फेरी : "FYCJ Admission 2026-27" शून्य फेरीचा वेळापत्रक (दिनांक : ८ मे ते २० मे २०२६) खालीलप्रमाणे-
१. दिनांक : ८ - १० मे २०२६ - नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्जाचा भाग - १ ऑनलाईन भरणे.
२. दिनांक : ११ - १३ मे २०२६ - अर्जाचा भाग - २ (पसंतीक्रम) भरणे. विद्यार्थी किमान १ व कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांचे (ज्युनिअर कॉलेज) पर्याय निवडू शकतील.
३. दिनांक : १४ - १५ मे २०२६ - तात्पुरती गुणवत्ता यादी "Provisional Merit List" प्रसिद्ध केली जाईल.
४. दिनांक : १६ मे २०२६ - यादीत काही चूक असल्यास "Grievance Redressal" द्वारे दुरुस्तीसाठी अर्ज करणे.
५. दिनांक : १८ - १९ मे २०२६ - अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल आणि कोटा अंतर्गत प्रवेशांचे वाटप केले जाईल.
६. दिनांक : २० मे २०२६ - रिक्त जागांची माहिती पोर्टलवर उपलब्ध होऊल.
● टीप : शून्य फेरी हि फक्त 'In House Quata' आणि 'Management Qouta' मधील प्रवेशासाठी असेल.
संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही शेवटचा विद्यार्थी प्रविष्ट होईपर्यंत गुणवत्तेनुसार ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. ऑनलाईन प्रणाली व्यतिरिक्त अन्य प्रणालीमधून एकही प्रवेश शाळा व्यवस्थापनास करता येणार नाही. Maharashtra State FYJC Online Admission