मुलांची उन्हाळी सुट्टी लागली की, पालकांची महत्त्वाची कागदपत्रे मिळवण्यासाठी लगबग सुरू होते. शाळा किंवा महाविद्यालयात शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रे सोबत जोडणे अनिवार्य असते.
Coste Certificate
जात प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून याचा वापर जातीचा पुरावा 'जात प्रमाणपत्र Coste Certificate' म्हणून करण्यात येतो तसेच जात पडताळणीसाठी आवश्यकच असते.
नवीन जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची पद्धत, अर्जासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे, अर्ज कसा भरायचा, कुठे जमा करायचा, याची माहिती बघणार आहोत. माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.
प्रथमतः जात प्रमाणपत्र Coste Certificate अर्ज महा-ई सेवा केंद्र किंवा सेतू मधून घ्यायचा आहे व वैयक्तिक माहिती, वडिलांची माहिती, पत्ता, दाखला आवश्यक असणाऱ्या व्यक्तीचे नाव, व्यवसाय, जातीचा उल्लेख काळजीपूर्वक भरा.
माननीय तलाठी साहेब आणि माननीय मंडळ अधिकारी साहेब यांचे अर्जावर सही घेणे बंधनकारक आहे. जात प्रमाणपत्र Coste Certificate अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
👉🏻 स्वतः@
1) आधार कार्ड
2) जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
👉🏻 भाऊ किंवा बहीण@
1) आधार कार्ड
2) जात प्रमाणपत्र
3) जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
👉🏻 वडील@
1) आधार कार्ड
2) जात प्रमाणपत्र
3) जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
👉🏻 काका@
1) आधार कार्ड
2) जात प्रमाणपत्र
3) जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
👉🏻 आजोबा@
1) आधार कार्ड
2) जात प्रमाणपत्र
3) जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
👉🏻 इतर@
1) 1950 चा पुरावा
2) सातबारा किंवा वनपट्टा
3) रेशन कार्ड
4) स्वयंघोषणापत्र पासपोर्ट फोटो सहित
5) अँफिडेवीट
Click here to... Income Certificate New Application Process...
Note :- जर नातलगातील एखादी व्यक्ती मृत पावले असेल तर आधार कार्ड, "जात प्रमाणपत्र Coste Certificate" जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला ऐवजी त्याचा मृत्यू दाखला जोडणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतूमध्ये अर्ज जमा करताना सोबत सत्यप्रत जोडावे आणि मूळ कागदपत्रे अपलोड करायचे असल्याने सोबत असू द्या.
👇🏻
Click here to... Maha Online Portal