मार्च महिन्याची 31 तारिख जाते, तसं भारतीय आर्थिक वर्ष संपते आणि 1 एप्रिल पासून उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते.
Income Certificate
शैक्षणिक प्रवेश घेण्याकरिता किंवा शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा म्हणून 'उत्पन्न दाखला Income Certificate' सोबत जोडणे अनिवार्य असते. माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा.
उत्पन्नाचा दाखला खूप महत्त्वाचे आहे, शाळा व महाविद्यालयात शैक्षणिक प्रवेश घेण्याकरिता, वस्तीगृह अर्ज भरण्यासाठी तसेच शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न दाखला (Income Certificate) आवश्यक असते.
उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया, अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करायचं, उत्पन्न दाखला Income Certificate किती दिवसात मिळणार याची माहिती घेणार आहोत.
महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतू मधून "उत्पन्न प्रमाणपत्र Income Certificate" फॉर्म घ्यायचा आहे व अर्जदाराची वैयक्तिक माहिती, (स्वतः कमावते असल्यास स्वतःच्या नावाने अर्ज करा अन्यथा वडिलांच्या नावे अर्ज करा) कौटुंबिक माहिती, पत्ता, व्यवसाय, उत्पन्नाची नोंदणी (मा. तलाठी साहेब करतील), अर्ज काळजीपूर्वक भरा व माननीय तलाठी साहेब यांचे अर्जावर सही घेणे अनिवार्य आहे. खालील कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहेत.
👉🏻 1) आधार कार्ड
2) रेशन कार्ड
3) स्वंयघोषणापत्र पासपोर्ट फोटोसहित
Click here to... ST Coste Certificate New Application Process...
अर्ज काळजीपूर्वक भरल्यानंतर अर्जासोबत वरील प्रमाणे कागदपत्रे जोडून प्रत्येक कागदावर मोकळ्या जागेत अंगठा किंवा सही करा आणि अर्ज जमा करायचे आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
उत्पन्न प्रमाणपत्र (दाखला) दोन-तीन दिवसात मिळून जाईल किंवा जास्तीत-जास्त पंधरा दिवस लागू शकतात. मा. तहसीलदार साहेबांचे या अप्रोवल मिळाल्यानंतरच आपल्याला मिळू शकेल.
👇🏻