PESA Certificate : पेसा दाखला ग्रामीण आदिवासी क्षेत्रात स्थानिक लोकांना अधिकार देण्यात आले असून त्याची अंमलबजावणी सरकारी नोकर भरती प्रक्रियेत करण्यात येत आहे.
PESA CERTIFICATE
पेसा दाखला (Pesa Certificate) विविध प्रकारच्या सरकारी भरतीसाठी (पेसा दाखला) आवश्यक असून दाखला हा मा. प्रकल्प अधिकारी यांनी स्वाक्षरीत केला असावा, Pesa Certificate असा जीआर दिनांक 16 जुन 2023 रोजी महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे. त्यासाठी पेसा दाखला काढण्यासाठी अनेक 'Pesa Dakhala Kadanya Sathi Kagad patre' कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
आधी मा. तहसिलदार यांचेकडे वितरित करण्याचे अधिकार होते, सध्या आयुक्तालयआणि प्रकल्प कार्यालयाकडून ऑनलाईन वितरित करण्यात येणार आहेत. pesa dakhala Kadanya sathi Kagadpatre अर्जदारांनी खालीलकागदपत्रे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील.
1) अर्जदारांचे विनंती अर्ज
2) वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) जात (जमात) प्रमाणपत्र
5) आधार कार्ड
6) स्वयंघोषणापत्र
7) गाव पेसा क्षेत्रात असल्या बाबत ग्रामसेवक दाखला
8) महिला विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला
वरीलप्रमाणे झेरॉक्स कागदपत्रे अर्जासोबत जोडून प्रकल्प कार्यालयात सादर करणे आवश्यक होते परंतु, अतव प्रकल्प कार्यालयामार्फत पेसा रहिवासी दाखला अर्जदारांना ऑनलाईन वितरित करण्यात येईल.