PM-KISAN : प्रधानमंत्री कृषी सम्मान निधी योजना, कृषी विभाग भारत सरकार द्वारा शेतकऱ्यांना ekyc करण्यासाठी वारंवार आवाहन करुन सुद्धा खूप शेतकऱ्यांची ekyc करायची बाकी आहेत.
PM KISAN EKYC
पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या लाभार्थीना यापुढील हफ्त्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 'pm kisan ekyc' करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत किंवा ग्रामस्तरावर जनजागृती करण्यात येत असून, कृषी सेवक व तलाठी शेतकऱ्यांना भेटून ekyc करण्यास प्रोत्साहन देत आहे. pm kisan ekyc करायची दोन पद्धती उपलब्ध असून शेतकऱ्यांना सोयिस्कर पद्धतीची निवड करुन pm kisan ekyc करुन घ्यायची आहे.
शेतकऱ्यांनी otp based ekyc निवडल्यास लाभार्थींच्या आधार कार्ड व मोबाईल क्रमांक एकमेकांना लिंग केलेले असावे. आधार कार्ड व मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर लाभार्थींना CSC सेंटर वर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करायचे आहे.
🌐 OTP based ekyc :-
1) प्रथमतः गुगल सर्च बॉक्स मध्ये pm kisan प्रविष्ट करा.
2) प्रदर्शित पहिल्या वेबसाईट वर क्लिक करा आणि Pm Kisan चे पोर्टल ओपन होईल.
3) पोर्टल ओपन झाल्यानंतर पेज खाली स्क्रोल करा व Farmar Corner मध्ये ekyc टॅब वर क्लिक करा.
4) आधार क्रमांक प्रविष्ट करुन सर्च बटन वर क्लिक करा.
5) नंतर मोबाईल क्रमांक रकान्यात प्रविष्ट करा, व गेट ओटीपी वर क्लिक करा.
6) आधारची लिंक असलेल्या मोबाईल क्रमांक वर otp येईल.
7) otp रकान्यात प्रविष्ट करा आणि पडताळणी झाल्यानंतर pm kisan ekyc done चा मेसेज स्क्रिन वर दाखविला जाईल.
8) "pm kisan ekyc" पूर्ण केल्यास लाभार्थी पुढील हफ्त्यासाठी पात्र होईल.
🌐 Biomatric based ekyc :-
पहिल्या पद्धतीत मोबाईल मध्ये pm kisan ekyc करू शकता. जर शेतकऱ्यांनी दुसऱ्या पद्धतीचा अवलंब केल्यास स्वतः लाभार्थींना CSC सेंटर मध्ये जाऊन ekyc करावी लागेल. शेतकरी लाभार्थ्यांनी स्वतः च आधार कार्ड व मोबाईल सोबत घेऊन जायचं आहे.
pm kisan ekyc शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे, ई-केवायसी केली नसल्यास लाभार्थींना PM-KISAN योजनेचा लाभ मिळणार नाही. वरीप्रमाणे दिलेल्या पद्धतीचा अवलंब करून pm kisan ekyc करुन शेतकरी योजनेचा लाभ निरंतर घेऊ शकतो.
👇🏻