Maharashtra Forest Department Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 ची भरती सुरु झाली असून ऑनलाईन वनरक्षक भरतीसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Forest Gourd Recruitment
महाराष्ट्र वन विभाग भरती ऑनलाईन अर्ज 'Maha Forest Recruitment' करण्याची प्रक्रिया दिनांक 10 जुन 2023 रोजी पासून सुरू असून, उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करुन ठेवा.
महाराष्ट्र वन विभागात एकूण आठ प्रकारच्या पदासाठी ऑनलाईन अर्ज पात्र उमेदवारांकडून मागण्यात येत आहे. "Forest Gourd Recruitment" वनरक्षक गट-क : 2138 पदे, लेखापाल गट-क : 129 पदे, सर्वेक्षण गट-क : 86 पदे, लघुलेखक (उच्च श्रेणी) गट-ब : 13 पदे, लघुलेखक (निम्न श्रेणी) गट-क : 23 पदे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट-ब : 08 पदे, वरिष्ठ सांख्यिकी गट-ब : 05 पदे, कनिष्ट सांख्यिकी गट-क : 15 पदे, अशा एकूण 2417 पदासाठी भरती सुरु आहेत.
🌐 ऑनलाईन प्रक्रिया :-
रजिस्ट्रेशन, वैयक्तिक माहिती, अतिरिक्त माहिती, पत्रव्यवहाराची माहिती किंवा संपर्क पत्ता, शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे अपलोड करणे आणि पेमेंट ह्या टॅब मधील माहिती आवश्यक (Maha Forest Recruitment : Required Documents List) संपूर्ण प्रविष्ट करणे अनिवार्य आहेत.
वनरक्षक महाभरतीसाठी 2023 साठी आवश्यक कागदपत्रांची साईज किती असावी? कोणत्या फॉरमॅट मध्ये असावी? कोणती कागदपत्रे अनिवार्य आहेत? ऐच्चिक कागदपत्रे कुठली? याची यादी खालीलप्रमाणे -
✴️ कागपत्रांची यादी :-
1) 10 वी गुणपत्रक
2) 12 वी गुणपत्रक
3) जातप्रमाणपत्र
4) आधार कार्ड
5) लहान कुटूंब प्रतिज्ञापत्र
6) पासपोर्ट छायाचित्र
7) स्वाक्षरी
✴️ Note :-
वरील कागदपत्रे अनिवार्य व अपलोड करायची असल्याने सोबत बाळगावी. 1 ते 5 पर्यंत कागदपत्रांची साईज ही 100-300 kb आणि JPG, PNG, PDF फॉरमॅट मध्ये असावी. पासपोर्ट छायाचित्र व स्वाक्षरी 50-80 kb तसेच JPG,PNG फॉरमॅट मध्ये असावी.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
8) अधिवास Domicile (फक्त माहिती प्रविष्ट करण्यासाठी)
9) पदवी (असल्यास)
9) पॅन कार्ड (असल्यास)
10) वाहन परवाना (असल्यास)
11) मतदान कार्ड (असल्यास)
12) पासपोर्ट (असल्यास)
वरील सर्व कागदपत्रे ही अधिवास (Domicile) प्रमाणपत्र सोडल्यास अनिवार्य नाही. असल्यास माहिती प्रविष्ट करावी अन्यथा नाही पर्याय निवडून पुढील प्रोसेस करावी.
👇🏻