Coste Velidity Certificate जात पडताळणी प्रमाणपत्र महाविद्यालयात, व्यवसायिक प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी तचेस निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असते.
Coste Velidity Certificate
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया, कागदपत्रे फाईल मध्ये जोडून जमा करणे इ. विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो लेख आवडल्यास नक्की शेअर करा.
🌐 ऑनलाईन प्रक्रिया :-
गुगल सर्च बॉक्स मध्ये e-Tribe Velidity सर्च करा आणि प्रदर्शित पहिल्या वेबसाईट वर जाऊन 'Coste Velidity Certificate' नवीन नोंदणी निवडा आणि विचारलेली महिती रकान्यात प्रविष्ट करून लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करा.
आयडी व पासवर्ड प्रविष्ट करून लॉगिन झाल्यानंतर अर्जदाराची मूळ माहिती, वडिलांची माहिती, अर्जदाराची वडिलांकडील नातेवाईकांची माहिती, पत्त्याचा तपशील, जात (जमाती) प्रमाणपत्र तपशील, शैक्षणिक माहिती, अर्जदाराची कौटुंबिक माहिती, शिक्षण किंवा निवडणूक विषयी माहिती, प्रायोजक संस्था तपशील, कागदपत्रे अपलोड करणे, फोटो व स्वाक्षरी/अंगठा अपलोड करणे आणि अर्ज सबमिट केल्यानंतर मोबाईल आणि ई-मेल वर प्रणालीद्वारे अर्ज क्रमांक पाठविला जाईल.
✴️ आवश्यक कागदपत्रे :-
जातपडताळणी प्रमाणपत्र Coste Velidity Certificate अर्ज करताना खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. अर्जदारांची, संबधित व्यक्तींचे, इतर पुरावे जोडणे अनिवार्य आहे.
👉🏻 अर्जदार @
1) शिफारस पत्र
2) जात (जमाती) प्रमाणपत्र (Original)
3) शाळा सोडल्याचा दाखला (४ थी)
4) शाळा सोडल्याचा दाखला (७ वी)
5) जन्म प्रमाणपत्र
6) नमूना नं. 1
7) वंशावळ प्रतिज्ञापत्र
8) आधार कार्ड
9) फोटो आणि सही/अंगठा
10) वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
👉🏻 वडिल @
1) जात (जमाती) प्रमाणपत्र
2) शाळा सोडल्याचा दाखला/अशिक्षित असल्यास प्रतिज्ञापत्र
3) जन्म प्रमाणपत्र ("Coste Velidity Certificate")
4) जात पडताळणी प्रमाणपत्र (असल्यास)
5) सही/अंगठा
👉🏻 आजोबा @
1) जात (जमाती) प्रमाणपत्र
2) शाळा सोडल्याचा दाखला
3) जन्म प्रमाणपत्र
👉🏻 भाऊ @
1) जात (जमाती) प्रमाणपत्र
2) शाळा सोडल्याचा दाखला
3) जात पडताळणी प्रमाणपत्र
👉🏻 काका @
1) जात (जमाती) प्रमाणपत्र
2) जन्म प्रमाणपत्र
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) जात पडताळणी प्रमाणपत्र (असल्यास)
👉🏻 इतर @
1) सातबारा किंवा वनपट्टा
2) नमूना नं. 14
3) रेशन कार्ड
वरील सर्व मूळ (Original) कागदपत्रे व झेरॉक्स प्रती फाईलमध्ये क्रमाने लावून जात पडताळणी समिती समोर सादर करणे आवश्यक आहे.
टीप :- अर्जदाराची संबंधित एखादी व्यक्ती मृत असल्यास मृत्यु प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहेत.
👇🏻
जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा...
#जात पडताळणी प्रमाणपत्र #Certificate of Velidity #Velidity Certificate