Google AI Tool : गुगलने पत्रकारांसाठी जेनेसिस नावाचं एक गुगल आर्टिफिशियल टूलची चाचणी करण्यासाठी तयार...
Google AI Tool
Google AI (Artificial Intelligence) Tool गुगल आर्टिफिशियल टूलची चाचणी सुरू असून, पत्रकारांना याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. जगभरात सध्या अनेक क्षेत्रांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढत आहे.
याचाच एक भाग म्हणून गुगलने पत्रकारांसाठी कंटेंट व बातम्या लिहण्यासाठी एक 'Google AI Tool' तयार केले असून त्याची चाचणी सुरू आहे. बातम्या व आर्टिकल लिहण्यासाठी या टूलची मोठ-मोठ्या वृत्तपत्रसाठी करण्यात येणार असल्याचे गुगल कडून सांगण्यात येत आहे.
सुरवातीला google ai tool ची चाचणी झाल्यानंतर न्युयॉर्क टाईम्स (New York Times), दि वॉशिंग्टन पोस्ट (The Washington Post), दि वॉल स्ट्रीट जर्नल्स (The Wall Street journal), न्यूज कॉर्प (New Corp) व अन्य वृत्तपत्राला देण्यात येणार आहेत. Google AI Tool हळूहळू सर्व वृत्तपत्रासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गुगलने स्पष्ट केले आहेत.
पत्रकारांना एक बातमी तयार करण्यासाठी वेळ लागतो तसेच दुसरी बातमी तयार करण्यासाठी वेळ नसतो, आता google genesis artificial intelligence tool गुगल जेनेसिस एआय टूलच्या मदतीने बातमी तयार करण्यास वेळ लागणार नाही.
परंतु याचे चांगले आणि वाईट परिणाम ही आहेत, "Genesis Google AI Tool" हे एक दुधारी तलवारीप्रमाणे असेल असं क्रेग न्यूमार्क ग्रॅज्युएट स्कूल ऑफ जर्नालिझमचे (Creg Numark Graduate School of Journalism) डायरेक्टर जार्व्हीस यांनी सांगितले.
Google Artificial Intelligence Tool चा वापर बातम्या लिहण्यासाठी करावा परंतु, संवेदनशील घटना, सांस्कृतिक घटना, राजकीय घटना संदर्भात Google AI Tool चा वापर टाळावा असे ही जार्व्हीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.