महाराष्ट्रात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व दुष्काळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पिक विमा योजना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फायद्याची ठरली आहे. महाराष्ट्रात खरीप हंगाम PMFBY एका रुपयांत काढला होता. सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून, रब्बी हंगामातील पिकांना एका रुपयांत प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत संरक्षण मिळणार आहेत.
PMFBY 2023-24
PMFBY : अंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 साठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. दिनांक : 01 नोव्हेंबर 2023 पासून pmfby.gov.in या वेबसाईट वर जाऊन शेतकऱ्यांनी आपला अर्ज ऑनलाईन सादर करावा. रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) साठी अंतिम तारिख 30 नोव्हेंबर 2023 रोजी पर्यंत, गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांद्यासाठी अंतिम तारिख 15 डिसेंबर 2023 रोजी पर्यंत आणि उन्हाळी भात, भुईमूग साठी अंतिम तारिख 31 मार्च 2024 रोजी पर्यंत मुदत असणार आहे.
विमा पात्र शेतकरी :- 1) कर्जदार 2) बिगर कर्जदार 3) 'PM Fasal Bima Yojana' भाडेपट्टीवर शेती करणारे इत्यादी सर्व शेतकरी.
विमा संरक्षित बाबी :- 1) नैसर्गिक आपत्तीपासून अधिसूचित क्षेत्र पातळीवर विमा संरक्षण, नुकसान भरपाई राज्य शासनाद्वारे केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारित. 2) चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंदले गेल्यास नुकसान भरपाई देय. Fasal bima yojana 3) पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान, अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानिक संरक्षण.
कुळाने अगर भाडेपट्टी कराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विमा करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भाडेपट्टी करार (Registered Tenent Agreement) अपलोड करणे बंधनकारक. प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी, लागवण किंवा उगवण न होणे (Prevented or Failed Sowing). पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान (Mid Season Adversity).
क्षेत्र पातळीवर हंगामाच्या शेवटी देय नुकसान भरपाई - pmfby-gov-in पीक पेरणी पासून ते काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड रोगराई इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट.
अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे होणारे नुकसानीस वैयक्तीक पातळीवर विमा संरक्षण (Localised Calamities) गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी Rabbi pik vima arj 2023-24 किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक अधिसूचित नैसर्गिक आपत्ती झाल्यामुळे होणारे अनुसूचित पिकांचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येईल.
PMFBY काढणी पश्चात नुकसान (Post Horvest Losses) - ज्या पिकांची काढणी नंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी किंवा काढणी नंतर सुकवणी साठी शेतात पसरवून ठेवलेल्या अनुसूचित पिकांचे काढणी नंतर दोन आठवड्याच्या आत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधीन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल. अनुसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसानीची सूचना 72 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक ,सबंधित बँक किंवा कृषी विभाग द्वारे द्यावी.
सहभाग प्रक्रिया :- प्रधानमंत्री पिक विमा योजना "Pradhan Mantri Pik Vima Yojana" अंतर्गत शेतकऱ्यांना सहभागाची दोन पद्धत असून एक कर्जदार शेतकरी व दोन बिगर कर्जदार शेतकरी ह्यांची विस्तृत माहिती पुढीलप्रमाणे -
1) कर्जदार शेतकरी :- प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे तथापि कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा करावयाचा नसेल त्यांनी योजनेत सहभागाच्या अंतिम दिनांकापूर्वी सात दिवस संबंधित बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे आवश्यक आहे. अन्यथा त्याच्या अनुसूचित पिकांचा विमा संबंधित बँकेमार्फत करण्यात येईल. "PMFBY" त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी मागील हंगामात आपल्या पिकांचा विमा न करणेबाबत घोषणापत्र आपल्या बँक शाखेत दिले असल्यास, चालू हंगामात विमा करण्यासाठी विहित नमुन्यातील घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
2) बिगर कर्जदार शेतकरी (ऐच्चिक) :- बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून आधार कार्ड, बँक पासबुक व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत वि.का.स. सेवा सोसायटी अथवा सीएससी केंद्रात( CSC) अंतिम मुदतीपूर्वी जमा करणे.
Bank and CSC केंद्रामध्ये विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारिख रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) 30 नोव्हेंबर 2023, गहू (बागायत), हरभरा,रब्बी कांदा 15 डिसेंबर 2023 आणि उन्हाळी भात, भुईमूग 31 मार्च 2024.