Mukhyamntri Ladaki Bahin Yojana 2024, Mazi ladki bahin yojana official website, ladki bahin yojana gr, Maharashtra State Scheme, Ladki bahin scheme, CM Ladki Bahin Yojana, Mazi ladki bahin yojana 2024 online apply, Mazi ladki bahin yojana link, Mukhya Mantri Ladaki Bahin Yojana Require Document List.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महाराष्ट्रात दिनांक : 28 जून 2024 रोजी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक, आरोग्य तसेच पोषण आहारात योग्य बदल, कुटुंबात महिलांची भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज दिनांक : 1 जुलै 2024 रोजी पासुन ते दिनांक : 31 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत लाभार्थी महिलांना ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी देण्यात आला आहेत. 'Mukhyamntri Mazi Ladaki Bahin Yojana - 2024 Document' योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पात्रता -
1) महाराष्ट्र राज्याची रहिवासी
2) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
3) वय 21 वर्ष ते 65 वर्ष या वयोगटातील सर्व महिला
4) पाच एकर शेतीची अट ही शिथील करण्यात आली आहे
5) परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला (Birth Certificate) किंवा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) किंवा अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) ग्राह्य धरण्यात येईल.
6) कुटूंबातील एका अविवाहीत महिला सुध्दापात्र असणार आहे. 'माझी लाडकी बहिण योजना लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे'
दरमहा १५०० रु. चा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी खालिलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
1) ऑनलाईन अर्ज (Online Application)
2) आधार कार्ड (Aadhar Card)
3) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) किंवा रेशन कार्ड (Ration Card) किंवा मतदार ओळखपत्र (Voter Card) किंवा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) किंवा जन्म दाखला (Birth Certificate)
4) उत्पन्न दाखला (Income Certificate) किंवा पिवळे व केशरी रेशनकार्ड
5) बँक पासबूक (Bank Passbook)
6) हमीपत्र
7) पासपोर्ट फोटो (Passport Size Photo)
8) लाभार्थींचे लाईव्ह फोटो काढायचा आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लाभार्थी महिला स्वतः हजर असणे आवश्यक आहे. लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहिती करिता "Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana" दिनांक : 28 जून 2024 रोजी निर्गमित केलेला जीआर वाचा.