Maha-DBT Farmar Seed Application महा-डीबीटी शेतकरी बियाणे अनुदान अर्ज सुरू...
![]() |
www.mmtonliness.in |
महा DBT शेतकरी योजना
महा-डीबीटी 'Maha-DBT' शेतकरी योजना वेबसाईट वर बियाणे अनुदान योजना कृषी विभागा मार्फत देण्यात येणार असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत असे कृषी विभागा मार्फत कृषी अधिकारी व कृषी सेवकांनी आवाहन केले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागाच्या योजनेसाठी ऑनलाईनअर्ज मागवण्यात येते. शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.
प्रथमतः शेतकऱ्यांना Maha DBT Farmar Portal वर शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक पडताळणी करणे, शेतकऱ्यांनी वैयक्तिक माहिती प्रविष्ट करावे, युजर आयडी व पासवर्ड तयार करुन आणि ईमेल आयडी व मोबाईल क्रमांकाची पडताळणी करुन नोंद करावी.
शेतकऱ्यांनी "Maha-DBT" वर लॉगिन करावे, नंतर शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, पत्ता, कुटूंबाची माहिती, जमीन, पीक माहिती, इतर माहिती प्रविष्ट करावे. प्रोफाईल अद्यावत झाल्यानंतर शेतकऱ्यांनी अर्ज सादर करा या टॅब वर क्लिक करून योजनेसाठी अर्ज सादर करायचे आहे.
अर्ज सुरू : १३ मे २०२३
अंतिम तारिख : २८ मे २०२३
पीक : सोयाबीन, तूर, मूग, उडीत, मका.
अनुदान : प्रमाणित बियाणे ५०% व प्रात्यक्षिक १००%.