MHT-CET
MHT CET : २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी सामाईक प्रवेश पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, दिनांक : ०१ जानेवारी २०२६ रोजी पासून ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहेत. "State Common Entrance Test Cell"
२०२६-२७ या शैक्षणिक वर्षात व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षा देणे बंधनकारक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक : २० फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यंत देण्यात आली आहे.
इयत्ता १२ वी विज्ञान वर्गात शिकत असलेले किंवा पास झालेले विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. एमएचटी-सीईटी २०२६-२७ परिक्षा मे महिन्यात नियोजित आहेत.
"MHT-CET : 2026-27"
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा पी.सी.बी. (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) गट परिक्षा दिनांक : १० मे २०२६ ते दिनांक : ११ मे २०२६ रोजी आणि पी.सी.एम. (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) गट परिक्षा दिनांक : १४ मे २०२६ ते १७ मे २०२६ रोजी पर्यंत नियोजित आहेत.
टीप :- परिक्षेची तारिख आणि वेळेत बदल होऊ शकतो, तसे असल्यास राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर कळवण्यात येईल. CET CELL
